पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ashes 2019:.. म्हणून पराभवानंतरही ऑसी कर्णधाराला संघाचा अभिमान

टीम पेन

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित अ‍ॅशेस कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत इंग्लंडने १३५ धावांनी पराभूत केले. पराभवानंतरही संघाच्या कामगिरीबद्दल अभिमान असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने  व्यक्त केले आहे. मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली असली तरी अ‍ॅशेस चषकावर ऑस्ट्रेलियाचा कब्जा कायम आहे. 

FIFA U 17 : महिला विश्वचषक स्पर्धेचा मुहूर्त ठरला!

पेन म्हणाला की, पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर मालिका बरोबरीत राहिली असली तरी मोहीम यशस्वी झाली. ऑस्ट्रेलियन संघ २००१ नंतर पहिल्यांदा अ‍ॅशेस मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. मात्र इंग्लंडने त्यांना पराभूत करत मालिका बरोबरीत सोडवली. 

PKL : पुण्याच्या मैदानात विक्रमी धमाका!

पेन पुढे म्हणाला, 'आम्ही अ‍ॅशेस ट्रॉफी मायदेशात घेऊन चाललो आहोत. याचा आम्हाला आनंद आहे.  इंग्लंडमधील कामगिरीबद्दल संघाचा अभिमान वाटतो, असेही त्याने म्हटले. आम्ही पहिले दोन सामने सहज जिंकले मात्र तिसऱ्या कसोटीत आम्ही संधी गमावली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ashes 2019 eng vs aus australian skipper tim paine reaction after fifth test match england vs australia