पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अपघाती कर्णधार टीम पेनला खुणावतोय 'हा' विक्रम

टीम पेन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ दोषी आढळला. त्याच्यासोबत उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवरही नामुष्की ओढावली. हा सर्व प्रसंग ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी काळा दिवसच होता. यातच अपघाताने टीम पेनकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व आले.  

सध्याच्या घडीला त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंड विरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत दिमाखदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने या प्रतिष्ठित मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली असून अखेरच्या कसोटीत एक अनोखा विक्रम टीम पेनला खुणावत आहे. ऑस्ट्रेलियाने  अखेरचा सामना अनिर्णित ठेवला तर इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका जिंकणाऱ्या मोजक्या कर्णधारांच्या यादीत टीम पेनच्या नावाचा समावेश होईल.

विराट-रोहित मतभेदावर शास्त्री गुरुजींनी मांडले परखड मत

अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला बरोबरी करण्यापासून रोखले तर टीम पेन ग्रेग चॅपल, रिकी पॉटिंग आणि मायकल क्लार्क या दिग्गज कर्णधारांना मागे टाकेल. पॉटिंग आणि क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये प्रत्येकी दोन -दोन वेळा मालिका खेळली पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आलेला नाही. १८ वर्षांपूर्वी स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या भूमीवर ४-१ अशी ही मालिका जिंकली होती. त्यानंतर आता टीम पेनकडे ऐतिहासिक विजयाची नोंद करण्याची संधी आहे.  

...म्हणून चहल-यादव जोड गोळीला संघात स्थान मिळेना!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ashes 2019 eng vs aus 5th test accidental australia captain tim paine on verge of ashes landmark