पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ashes 2019 : लॉर्डसवर 'लॉर्ड' खेळीसाठी इंग्लंड संघात मोठा फेरबदल

इंग्लंडचा संघ

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर रंगणार आहे. सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी १२ सदस्यीय संघाची घोषणा केली. दुसऱ्या कसोटीमध्ये दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. 
पहिल्या कसोटीत मोठा पराभव स्वीकारलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. मोईन अलीच्या जागी सॅम कुरेनला संघात स्थान देण्यात आले असून जेम्स अँड्रसनऐवजी युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरला संधी देण्यात आली आहे.  

विंडीजचा धाकड गडी वजन कमी करण्यासाठी करतोय मोठी कसरत

जोफ्रा आर्चर ऑस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथच्या खेळीला अंकुश लावण्यात यशस्वी ठरेल, अशी इंग्लंडला आस आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचे इंग्लंडसमोर आव्हान निर्माण झाले आहे. इंग्लंडमध्ये १८ वर्षानंतर मालिका जिंकण्याच्या इराद्याने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने स्मिथच्या खेळीच्या जोरावर पहिल्या कसोटीत छाप सोडली होती.  

इंग्लंडचा संघ 
रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो रुट (कर्णधार), जो डेन्ली, जोस बटलर, बेन स्टोक्स,  जॉनी बेअरस्टो, सॅम कुरेन, क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड 

ऑस्ट्रेलिया संघ 
टिम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, कॅमरन बॅनक्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टिव्ह स्मिथ. ट्रॅव्हिस हेड. मॅथ्यू वेड, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लायन. जोश हेजलवूड 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ashes 2019 eng vs aus 2nd test match england vs australia england announced 12 members team for lords test match