पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jaitley passes away: राहुल, सोनिया गांधींनीही वाहिली श्रद्धाजंली

राहुल गांधी यांनीही जेटली यांना श्रद्धांजली वाहिली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. एम्स रुग्णालयात दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी सकाळी ११ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजपच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे.  

एम्स रुग्णालयातून जेटलींचे पार्थिव कैलाश कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी याठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आपल्यावतीने पुष्पहार अर्पण करत जेटलींना श्रद्धांजली वाहिली. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील जेटलींच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपच्या अनेक नेत्यांनी जेटलींच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक नेत्यांनी पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.  

भाजपच्या दिग्गज नेत्यांनंतर रात्री उशाराने काँग्रेसच्या नेत्यांनीही जेटली यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस कार्यवाहू अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जेटली यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धाजंली वाहिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: arun jaitley former finance minister and senior bjp leader passes away at 66 live updates