पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोप प्रकरणात शमी विरोधात अटक वॉरंट

मोहम्मद शमी

विंडीज दौऱ्यावर भारतीय संघाच्या ताफ्यात सहभागी असलेल्या जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमद यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील अलीपूर कोर्टाने हे अटक वॉरंट जारी केले आहे. 

पाकिस्तानी क्रिकेटर्सचे सोशल अकाउंट हॅक

हसीन जहाँने २०१८ मध्ये मोहम्मद शमीवर मारहाण, बलात्कार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी तिने शमी विरोधात तक्रार दाखल केली होती. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील घटस्फोटाचा खटला देखील कोलकात्ता कोर्टात आहे.   

चांद्रयान-२ च्या यशात मानाचा तुरा, विक्रम लॅंडर आणि ऑर्बिटर स्वतंत्र

अलीपूर कोर्टाने शमीला हजर होण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. जर १५ दिवसांत शमी हजर झाला नाही तर त्याला अटक करा, असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. हसीन जहाँने दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी मोहम्मद शमीवर गुन्हा दाखल केला होता.