पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईसाठी महाराष्ट्राला 'विरुष्का'ची मदत

विराट- अनुष्का

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं कोरोनाविरोधातील लढाईत  देशवासीयांना मदत करण्याचं ठरवलं आहे. विराटनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे.  त्याचबरोबरच पीएम केअर फंडलाही निधी देणार असल्याचं ट्विटरच्या माध्यामातून त्यानं जाहीर केलं आहे. 

विश्वचषकातला 'हिरो' जोगिंदर कोरोनाविरोधातील लढाईत ठरतोय 'जगाचा हिरो'

'पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत  जाहीर करण्याची मी आणि पत्नी अनुष्कानं शपथ घेतली आहे. कित्येक लोकांना सद्य परिस्थितीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे, हे पाहून आमचं काळीज पिळवटून निघालं आहे. देशातल्या नागरिकांचं दुख: काही प्रमाणात कमी करण्यासाठी आम्ही दोघंही आमचं योगदान देत आहोत', असं ट्विट विराटनं केलं आहे. 

क्रीडा विश्वातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जात आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडुंपैकी सुरेश रैनानं ५२ लाख, सचिन तेंडुलकर यानं ५० लाख, अजिंक्य रहाणेनं १० लाख, सौरभ तिवारीनं दीड कोटी, ईशान किशननं २० लाखांची मदत देऊ केली आहे. तर बीसीसीआयनं पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५२ कोटींचा निधी दिला आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशननं देखील आर्थिक मदत देऊ केली आहे.

रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ हजार लोकांसाठी सलमान खानची आर्थिक मदत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Anushka Sharma Virat Kohali pledge support towards PM CARES Fund and the Chief Minister Relief Fund Coronaoutbreak