पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाउनची नामुष्की ओढावली आहे. कोरोनामुळे जगात घोंगावत असलेल्या संकटामुळे खेळाची मैदाने ओस पडली आहेत. लॉकडाउनच्या काळात खेळाच्या मैदानापासून दूर असलेल्या खेळाडूंचे दर्शन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. मैदानावर नेहमीच आपल्या आक्रमक स्वभावाने सर्वांची मनं जिंकणारा  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा लॉकडाउनमध्ये पत्नी अनुष्कासमोर कूल अंदाजात दिसत आहे. 

US ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेबाबतचा 'फैसला' जूनमध्ये होणार!

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात आपल्या हबीला हेअर लूक देण्यात गुंतलेलेली अनुष्काचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यातही लोकप्रिय असेल्या कपलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय. अनुष्का शर्माने आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का कोहली कोहली.. असे ओरडताना पाहायला मिळते.

'IPL च्या यजमानपदासाठी श्रीलंकन बोर्डाकडून कोणताही प्रस्ताव नाही'

क्रिकेटच्या मैदानावर कोहलीच्या बॅटमधून चौकाराची अपेक्षा करणारा चाहता वर्ग आपण अनेकदा पाहिला आहे. या व्हिडिओत अनुष्का विराटला चौकार मार ना! असे म्हणताना दिसते. 'ये कोहली क्या कर रहा है, चौका मार ना चौका! असे शब्द अनुष्का उच्चारताना दिसते. विराट नक्की काय करतोय हे स्पष्ट दिसत नसले तरी तो काही तरी वाचन वैगेर करत असावा असेच वाटते. अनुष्काच्या शाब्दिक माऱ्याकडे कूल अंदाजात दुर्लक्ष करत तो आपल्या कामात पुन्हा मग्न होताना देखील व्हिडिओत पाहायला मिळते.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:anushka sharma shared a video with virat kohli on instagram during coronavirus lockdown watch video here