पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कृपया माझ्या नावाचा वापर करु नका, अनुष्काच्या भावनांचा बांध फुटला

अनुष्का शर्मा

विराट कोहलीच्या खराब कामगिरीनंतर अनेकदा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असताना अनुष्का शर्माला नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता अनुष्काच्या नावाच्या उल्लेखामुळे क्रिकेट वर्तुळात नवा वाद पेटला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीवर निशाणा साधताना माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनीअर यांनी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा उल्लेख केला होता. विश्वचषकातील काही सामन्यादरम्यान निवड समितीमधील लोक अनुष्काला चहा आणून देताना मी पाहिले आहे, असे फारुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.   

प्रसारमाध्यमांतील वृत्तानंतर यासंदर्भात चर्चा रंगत असताना अनुष्काने ट्विटरच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली आहे. अनेकदा क्रिकेटच्या मैदानातील घडामोडींमध्ये आपल्या नावाने निर्माण केलेल्या वृत्तावर तिने मौन सोडले आहे. तिने ट्विटरवरुन एक पत्र शेअर केले आहे. यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'वर्ल्डकपमध्ये सिलेक्टर्सनां अनुष्काला चहा देताना पाहिलंय'

तिने लिहलंय की,  प्रसारमाध्यमांतून पसरणाऱ्या अफवांवर व्यक्त होण्यापेक्षा मी मौन बाळगणे पसंत करते. ११ वर्षांपासून मी अनेक गोष्टी सहन केल्या. पण खोट्या गोष्टीवर शांत राहिले तर त्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात. मला आज हा विषयच संपवायचा आहे.  विराट माझ्यातील नात्याला सुरुवात झाल्यापासून अनेकदा माझ्याबद्दल अपप्रचार करण्यात आला. विराटच्या खराब कामगिरीचे खापर माझ्यावर फोडण्यात आले. मी ते शांतपणे सहन केले. अनुष्का शर्मा बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित असते, अशा अफवा पसरल्या गेल्या. संघ निवडीमध्ये माझा हस्तक्षेप असतो, असेही बोलले गेले. मला बीसीसीआयकडून खास पाहुणचार मिळतो. परदेशी दौऱ्यावर विराटसोबत जाण्यावरुनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. प्रोटोकॉलचे पालन करुन देखी माझ्यासंदर्भात करण्यात आलेल्या अपप्रचारावर मी शांत राहिले. 

मानसिक आरोग्याच्या कारणावरून मॅक्सवेलची क्रिकेटमधून विश्रांती

मी विश्वचषकात केवळ एक सामना पाहण्यासाठी गेले होते. तो सामना मी सिलेक्टर बॉक्समध्ये नाही तर फॅमिली बॉक्समध्ये बसून पाहिला. शिवाय सामना मी माझ्या पैशांनी पाहते. मला बीसीसीआयकडून तिकीट मोफत मिळत नाही. जर तुम्हाला निवड समितीवर प्रश्न उपस्थित करायचे असतील तर त्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण कृपया माझ्या नावाचा उल्लेख करु नका. अशा गोष्टीत माझे नाव वापरण्याची परवानगी मी कुणालाही देणार नाही किंवा दिलेली नाही. या वृत्तामुळे अस्वस्थ झाले म्हणून मी माझे मौन सोडलेले नाही. एखादी व्यक्ती शांत आहे याचा अर्थ ती कमजोर आहे असे समजू नये, यासाठी मी माझ्या भावना व्यक्त केल्याचे अनुष्काने म्हटले आहे.