पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हमे 'कबूल' है !, अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमला अमूलची साथ

आयसीसी विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी अमूल अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अधिकृत प्रायोजक (Amul Twitter)

आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाचे खेळाडू हे आशियातील सर्वात मोठा दूध ब्रँड अमूलच्या जर्सीत दिसणार आहेत.  विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख प्रायोजक बनला आहे.

गौतम गंभीरचे केजरीवाल यांना चर्चेचे आव्हान, पण एक अट

अफगाणिस्तानचा संघ प्रशिक्षणापासूनच संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत अमूलचा लोगो असलेल्या जर्सीत खेळणार आहे. सुमारे ४५ हजार कोटी रुपये (सुमारे ६.५ अब्ज डॉलर) व्यवसाय असलेल्या अमूलचा लोगो विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या जर्सीवर आणि ट्रेनिंग किटवर दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक वेगाने वाढणारा संघ म्हणून मानांकन मिळालेल्या अफगाणिस्तान क्रिकेटशी जोडले गेल्याबद्दल आम्ही उत्साहित असून हा संघ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा असल्याचे जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. 
आर.एस. सोढी यांनी म्हटले आहे. 

 

अमूल मागील दोन दशकांपासून दूध पावडर आणि बेबी फूड अफगाणिस्तानला निर्यात करत आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष असदुल्लाह खान म्हणाले की, अमूल आम्हाला प्रायोजित करत आहेा. अफगाणिस्तानसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. विश्वचषकात पूर्ण सदस्य म्हणून खेळण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. आमची तयारी चांगली असून आमचा खेळही चांगला राहिल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Amul will be sponsor of Afghanistan Cricket Team in ODI World Cup 2019 held in England and Wales