पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुवर्ण संधी हुकली, अमित पंघलने ऐतिहासिक कामगिरसह पटकावले रौप्य

अमित पंघल

आशियाई चॅम्पियन अमित पंघलने शनिवार रशियातील एकतरिनबर्गच्या रिंगणात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्याने ५२ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत चंदेरी कामगिरी करणारा तो पहिला बॉक्सर ठरला आहे. अंतिम लढतीत रिओ ऑलिम्पिक विजेत्या उज्बेकिस्तानच्या शाखोबिदिन जोयरोव याच्याकडून त्याला ५-० असा पराभव स्वीकारावा लागला. 

जागतिक कुस्ती स्पर्धाः बजरंग, रवीची कांस्य पदकावर मोहोर

पहिल्या राउंडमध्ये भारतीय बॉक्सर सावध खेळ करताना दिसला. दुसऱ्या राउंडमध्ये त्याने संधी निर्माण करुन प्रतिस्पर्धीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश लाभले नाही. तिसऱ्या राउंडमध्ये जोयरवने काही अप्रतिम पंच मारत सामना आपल्या बाजूने वळवला. पंचाचा निर्णय त्याच्या पारड्यात पडल्यामुळे त्याने सुवर्णपदाकवर नाव कोरले. 

 

माहीच्या निवृत्तीवर सनी पाजींचा 'स्टेटड्राइव्ह'

या स्पर्धेत मनीष कौशिकने ६३ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली होती. याशिवाय आतापर्यंत विजेंदर सिंह (२००९), विकास कृष्ण (२०११), शिव थापा (२०१५) आणि गौरव बिधुडी (२०१७) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. अमित पंघल ऐतिहासिक सुवर्ण पदकाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहचला होता. सामन्यातील पराभवनानंतरही अमितने आपल्या नावे ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. याशिवाय अमित आणि मनीष यांनी आपापल्या वजनी गटात टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: amit panghal creates history and becomes first indian to win silver medal at world boxing championship