पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंबाती रायडूचा यू-टर्न, निवृत्तीचा निर्णय मागे

अंबाती रायडू

दोन महिन्यांपूर्वी क्रिकेटला अलविदा करणाऱ्या अंबाती रायडू याने यू-टर्न घेतला असून, त्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला ई-मेल पाठवून आपण निवडीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. आपण केवळ भावनेच्या भरात निवृत्तीचा निर्णय घेतला होता, असाही खुलासा त्याने आपल्या ई-मेलमध्ये केला आहे.

शशी थरुर यांनी पुन्हा मोदींचे केले कौतुक, आव्हानही स्वीकारले

ई-मेलमध्ये अंबाती रायडूने लिहिले आहे की, मी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. सर्व फॉर्ममधील क्रिकेट खेळण्यासाठी मी उपलब्ध आहे. याच ई-मेलमध्ये त्याने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या व्यवस्थापनाचे आणि क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याचेही आभार मानले आहेत. या दोघांमुळेच मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे त्याने म्हटले आहे.

येत्या १० सप्टेंबरपासून आपण हैदराबाद संघात परतण्यासाठी उपलब्ध असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर हैदराबाद संघातील उत्कृष्ट खेळाडूंसोबत क्रिकेट खेळताना आपल्या आनंद होत असल्याची भावनाही व्यक्त केली आहे. 

नव्या भारतामध्ये तरुणांच्या आडनावाला महत्त्व नाही - मोदी

अंबाती रायडूच्या ई-मेलनंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने एक मेल जारी केला असून, त्यामध्ये अंबाती रायडूने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर २०१९-२० मधील क्रिकेट स्पर्धांसाठी तो उपलब्ध असल्याचे त्याने कळविले असल्याचे सांगितले आहे.