पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उसेन बोल्टलाही जमलं नाही ते १० महिन्याच्या लेकराच्या आईनं करुन दाखवलं

धावपटू एलिसन फेलिक्स

अमेरिकेची १० महिन्याच्या लेकराच्या आईने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उसेन बोल्टचा विक्रम मागे टाकत नवा इतिहास रचला आहे. धावपटू एलिसन फेलिक्स हिने ४*४०० मीटर मिश्र रिले प्रकारात संघाला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तिची कामगिरी आपल्या वेगाने जगाला थक्क करुन सोडणाऱ्या उसेन बोल्टचा विक्रमाला मागे टाकणारी ठरली. विशेष म्हणजे १० महिन्यांचे बाळ असताना तिने विक्रमी कामगिरी करुन दाखवली. 

सहा वेळा ऑलिम्पिक विजेत्या फेलिक्सने गेल्या वर्षीच मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर ती पहिल्यांदाच मैदानावर उतरली होती. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील तिचे हे १२ वे सुवर्ण पदक आहे. एखाद्या जागतिक स्पर्धेत एवढी सुवर्णपदके जिंकणारी फेलिक्स पहिली धावपटूही ठरली. यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्ट याच्या नावावर होता. जागतिक स्पर्धेत बोल्टच्या खात्यात ११ सुवर्ण पदक आहेत.  

अमेरिकेच्या मिश्र रिले संघाने ३ मिनिटे आणि ९.३४ एवढ्या वेळात हे अंतर पार केले. ३३ वर्षीय फेलिक्सने जागतिक स्पर्धेत पाचव्यांदा सहभाग घेतला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:allysonfelix officially holds the record for the most world titles after giving birth 10 months ago