पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पांड्यानं सराव तर सरु केला, पण... कमबॅक कधी?

हार्दिक पांड्या

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या लवकरच मैदानात उतरण्यास सज्ज होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  पाठिवर झालेल्या शस्त्रक्रियेपासून तो संघाबाहेर आहे. मात्र त्याने बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करण्यास सुरुवात केली आहे.

ICC Ranking: बुमराह आता अव्वल राहिला नाही!

आयएएनएस वृत्तसंस्थेने एनसीएच्या सूत्राच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा सरावाला सुरुवात केली. तो लवकरच संघात पदार्पण करण्यास सज्ज असेल, असेही त्यांनी सांगितले. ग्रेट ब्रिटनमध्ये नियमित तपासणी (रुटीन चेकअप) करुन परतल्यानंतर या आठवड्यापासून त्याने सरावाला सुरुवात केली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर सर्व खेळाडू आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी सज्ज होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी पांड्या मैदानात उतरण्याचे संकेत सध्या मिळत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तो संघात परतेल, अशी आस आहे.  

AUSvsIND Womens T20I Final: स्मृतीचं धमाकेदार अर्धशतक, पण...

हार्दिक पांड्याने सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. तर इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत तो अखेरचा एकदिवसीय सामना खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी अद्याप महिनाभराचा अवधी असून तो निवडीसाठी उपलब्ध असेल, असे सूत्रांनी म्हटले आहे. राष्ट्रीय संघात परतण्यासाठी त्याच्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध करावा लागला तर त्याचे पुनरागमन लांबणीवर पडू शकते.