पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL गोत्यात आल्यामुळे खेळाडूंना मोठा आर्थिक दणका बसणार!

रोहित शर्मा आणि महेंद्रसिह धोनी (संग्रहित छायाचित्र)

आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात खेळाडूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता दाट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर देशभरात १४ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे स्पर्धेसंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर स्पर्धा झाली नाही तर खेळाडूंना मोठा फटका बसणार आहे. स्पर्धा झाली नाही तर खेळाडूंना कोणत्याही प्रकारे मानधन मिळणार नाही.

संयम आणि जिद्दीच्या तटबंदीच्या जोरावर आपण हे युद्ध जिंकू : उद्धव ठाकरे

इंडियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना ठरलेली रक्कम देण्यासाठी एका खास प्रणालीचा वापर करण्यात येतो. स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आठवडाभरापूर्वी खेळाडूंना १५ टक्के रक्कम देण्यात येते. स्पर्धेच्या दरम्यान  टूर्नामेंट के दौरान ६५ टक्के आणि स्पर्धेचा समारोप झाल्यानंतर निर्धारित वेळेत उर्वरित २० रक्कम देण्यात येते.

नेयमारनं 'सोशल डिस्टन्सिंग'चं उल्लंघन केलेल नाही, टीमकडून स्पष्टीकरण

अशोक मल्होत्रा पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे देशांतर्गत खेळाडूंच्या वेतनावर परिणाम दिसू शकतो. त्यांच्या मानधनाच्या रक्कमेत कपात केली जाऊ शकते. सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धेसंदर्भात कोणताही अंदाज वर्तवणे शक्य नाही. आयपीएल स्पर्धे नियोजित वेळेत घेण्यावर ठाम असलेले बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सध्याच्या परिस्थिती जैसे थे असल्यामुळे स्पर्धेच नक्की काय होईल, यावर बोलणे शक्य नाही म्हटले आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेवरही संकटाचे ढग दाटले आहेत. ही स्पर्धा रद्द झाली तर आयपीएल व्हावे यासाठी जोर लावला जाईल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.