पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ड्रग्ज प्रकरणानंतर हा फलंदाज वर्ल्डकप संघातून बाद!

अलेक्स हेल्स

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने सोमवारी सलामीवीर अलेक्स हेल्सचे नाव सर्व आंतरराष्ट्रीय संघातून वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे अलेक्सला आता विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. यापूर्वी अंमली पदार्थ चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर हेल्सवर २१ दिवसांची बंदी आणि वार्षिक उत्पनाच्या ५ टक्के दंडाची कारवाई करण्यात होती. त्यानंतर आता त्याला आंतरराष्ट्रीय संघातूनच डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या ऐवजी संघात कोणाची वर्णी लागणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.    

यावर प्रतिक्रिया देताना इंग्लंड आणि वेल्स मंडळाचे व्यवस्थापकिय संस्थापक एश्ले जायल्स म्हणाले की, हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही खूप विचार केला. इंग्लंड संघाची बांधणी करण्यासाठी आम्ही मेहनत घेतली आहे. त्यामुळे संघातील वातावरण चांगले ठेवण्यावर भर देणे गरजेचे आहे. संघाचे हित लक्षात घेवून हा निर्णय घेतला आहे. खेळाडूंनी अशा गोष्टींपासून दूर राहत खेळावर लक्षकेंद्रित करावे, असे ही त्यांनी सूचित केले. या निर्णयामुळे अलेक्सची क्रिकेट कारकिर्द संपलेली नाही. त्याला आम्ही हवी ती मदत करायला तयार आहोत, असेही अश्ले यांनी म्हटले आहे.  

अलेक्स हेल्स अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. नॉटिंघमशायर या क्लबने तो वैयक्तिक कारणास्तव निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. त्यानंतर अंमली पदार्थ चाचणीमध्ये दोषी आढळल्याने त्याच्यावर २१ दिवसांची बंदी घालण्यात आल्याची वृत समोर आले होते. त्याच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अष्टपैलू जोफ्रा आर्चरला संधी मिळू शकते.