पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजिंक्य लवकरच 'बाप' माणूस होणार, फोटो शेअर करुन व्यक्त केला आनंद

अजिंक्य रहाणे

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे लवकरच बाप माणूस होणार आहे. अजिंक्यने पत्नी राधिकासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये त्याची पत्नी मराठमोळ्या वेशात दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤️❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

२६ नोव्हेंबर २०१४ मध्ये अजिंक्य रहाणे राधिकासोबत विवाह बंधनात अडकला होता. दोघे एकमेकांना लहानपासूनच ओळखत होते. कॉलेज जीवनात मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर या जोडीने एकमेकांसोबत आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.  

अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून संघाच्या बाहेर आहे. आयपीएलनंतर विश्वचषकासाठी संधी मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला होता. पण विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात स्थान मिळवण्यात त्याला अपयश आले होते. त्यानंतर विंडीज दौऱ्यासाठी त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.     

डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ajinkya rahane will be father soon the cricketer himself shares the photos of his pregnant wife radhika see