पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजिंक्य रहाणेच्या गोंडस चिमुकलीला पाहिले का?

अजिंक्य रहाणे

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे बाप झाल्याने खूप आनंदी झाला आहे. मुलगी झाली त्यावेळी अजिंक्य दक्षिण अफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी विशाखापट्टणम येथे होता. मुलगी झाल्याची खबर कळताच अजिंक्य रहाणेने त्वरीत मुंबईत धाव घेतली. आपल्या लाडक्या परीची आणि पत्नी राधिकाची भेट घेतली. अजिंक्यने पत्नी आणि चिमुकलीसोबतचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hello ❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

 

शेतीला गती, उद्योगांना चालना देणारा महाआघाडीचा 'शपथनामा'

अजिंक्यची पत्नी राधिकाने शनिवारी मुलीला जन्म दिला. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने ट्विट करत अजिंक्य रहाणेला मुलगी झाल्याची माहिती ट्विटरवर शेअर केली. राधिका आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम असल्याचं हरभजनने ट्विटमध्ये सांगितले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Our bundle of joy is here 🥰

A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar) on

अजिंक्य आणि राधिका हे शाळेपासून एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. लहानपणापासून दोघे सोबतच लहानाचे मोठे झाले. २६ सप्टेंबर २०१४ मध्ये अजिंक्य रहाणेने प्रेयसी राधिकाशी लग्न केले होते. 

वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर