पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे काळाची गरज : अजिंक्य

अजिंक्य रहाणे

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे यांने देशव्यापी लॉकडाऊनमध्ये मानसिक संतुलनावर लक्ष केंद्रीत राहायला हवे, असा सल्ला दिलाय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० लाख रुपयांची मदत केल्यानंतर अजिंक्य रहाणे याने कोरोनाविरोधातील लढ्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. अजिंक्यने ट्विटच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या परिस्थितीत मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

कर्मचारी संघटनेचा भत्ता कपातीला विरोध, दिला मोदींच्या भाषणाचा दाखला

राज्य सरकार, बृहमुंबई महानगरपालिका प्रशासनाने जनतेसाठी अत्यावश्य असणाऱ्या या गोष्टीची काळजी घेतली असून यासंदर्भात प्रशासनाकडून टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आल्याची माहिती अजिंक्यने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, राज्य सरकार, बीएसी आणि एमपॉवर  यांनी सध्याच्या कठीण प्रसंगात मानसिक संतुलनाची आवश्यकता लक्षात घेत हेल्पलाइन सेवा सुरु केली आहे. 1800-120-820050 या क्रमांकावर कॉल करुन मानसिक आरोग्याविषयी  मार्गदर्शन मिळेल. याशिवाय रोहित शर्माने देखील ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर; ५० रुग्णांना डिस्चार्ज

राज्याल कोरोना विषाणूचा आकडा हा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दोन हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील पन्नासहून अधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून यामुळे लोक सध्या दुहेरी अडचणीचा सामना करत आहेत. अचानक सर्व काम थांबवून घरात बसून करायचे काय? हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. या परिस्थितीत मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणे हे देखील एक आव्हानच आहे.