पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न

अजिंक्य- राधिका

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला मुलगी झाली आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाने मुलीला जन्म दिला आहे.  भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने ट्विट करत अजिंक्य रहाणेला मुलगी झाल्याची माहिती ट्विटरवर दिली. 

बर्थडे बॉय पंतच्या संघर्षाची 'अनडोल्ड' कहाणी

राधिका आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम असल्याचंही हरभजन सिंहनं ट्विटद्वारे कळवलं. अजिंक्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे कसोटी सामना खेळत आहे. २०१४ मध्ये अजिंक्य रहाणेनं प्रेयसी राधिकाशी लग्न केलं. हे दोघंही शाळेपासून एकमेकांचे घट्ट मित्र होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤️❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

PKL : जयपूरचे प्ले ऑफचे आव्हान कायम, हरियाणानेही मैदान मारलं

अजिंक्य आणि राधिकानं काही दिवसांपूर्वी  सोशल मीडियाद्वारे ते आई- वडील होणार असल्याची बातमी दिली होती. अजिंक्य आणि राधिकानं अद्यापही सोशल मीडियावर जाहीर केलं नसलं तरी हरभजन सिंहनं दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.