पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अजिंक्य रहाणेकडून १० लाखांची मदत

अजिंक्य रहाणे

टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० लाखांची मदत देऊ केली आहे.  महाराष्ट्रात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही वाढतच चालली आहे. रविवार दुपारपर्यंत हा आकडा १९३ वर होता. कोरोना विषाणूचा  सामना करण्यासाठी उद्योजक, समाजसेवक नेते मंडळी, सेलिब्रिटी, खेळाडू आर्थिक मदत जाहीर करत आहेत. अजिंक्यनंही या लढाईत आपला खारीचा वाटा उचलला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्यनं १० लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केली आहे.

COVID-19 अंतर ठेवायच म्हणजे त्यांना समाजातून आऊट करायचय नाही: सचिन

आतापर्यंत भारतीय खेळाडुंपैकी सुरेश रैना ५२ लाख, सचिन तेंडुलकर यानं ५० लाख, सौरभ तिवारीनं दीड कोटी, ईशान किशननं २० लाखांची मदत देऊ केली आहे. तर बीसीसीआयनं पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५२ कोटींचा निधी दिला आहे.

कोरोना: तुटपुंज्या मदतीवरुन धोनीला ट्रोल करणाऱ्यांवर साक्षी भडकली