पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: स्मिथनंतर जोफ्राचा लाबुशेनला जबरा 'बाऊन्सर'

जोफ्राच्या चेंडूवर लाबुशेनची तारांबळ

अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात इंग्लंडचा युवा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरनं आपल्या भेदक माऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जोफ्राचा एक उसळता चेंडू स्मिथच्या मानेवर लागल्याची जोरदार चर्चा रंगली होती. 
त्यानंतर जोफ्रा आर्चरने आणखी एका कांगारुलाही घाम फोडला.  

VIDEO: आर्चरचा १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूने घेतला स्मिथच्या डोक्याचा वेध

इंग्लंडने ठेवलेल्या २६७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. १५४ धावांत त्यांचे ६ गडी तंबूत परतले होते. ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत असताना मार्नस लाबुशेन आणि ट्रेविस हेडने सावध खेळी करत ऑस्ट्रेलियाला सावरले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात उसळत्या चेंडूवर स्मिथला मैदानात पडायला भाग पाडणाऱ्या आर्चरने दुसऱ्या डावात संयमी खेळी करणाऱ्या लाबुशेनलाही एक अप्रतिम बाऊन्सर मारला.

जोफ्राला खिलाडूवृत्ती शिकवणाऱ्या अख्तरची युवीनं घेतली शाळा

जोफ्रा आर्चरच्या आखूड टप्प्याच्या चेंडू पुढे येऊन संयमीपणे खेळण्याचा लाबुशेनचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आर्चरचा चेंडू त्याला समजेपर्यंत चेंडूने हेल्मेटचा वेध घेतला होता. वेगवान चेंडू हेल्मेटवर लागल्यानंतर लाबुशेन देखील धडपडत मैदानात कोसळल्याचे पाहायला मिळाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:After Steve Smith his substitute Marnus Labuschagne floored as Jofra Archer deadly bouncer hits his Helmet during Lords Test of ashes series