पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशव्यापी लॉकडाऊसह IPL चा कांउटडाऊनही वाढतोय!

आयपीएल स्पर्धेवर कोरोनाचे सावट

जगातील मानाची ऑलिम्पिक स्पर्धेसह युरोपातील लोकप्रिय फुटबॉल लीग आणि टेनिसच्या कोर्टवरील मानाच्या स्पर्धा स्थगितीचा निर्णय झालाय. पण बीसीसीआय मात्र आयपीएलमधून माघार घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईल आणि स्पर्धा काही प्रमाणात बदल करुन खेळवण्यात येईल, अशी आशा बीसीसीआयला असल्याचे दिसते. त्यामुळेच देशव्यापी लॉकडाऊननंतर आयपीएल स्पर्धेबाबतचा निर्णयही लांबणीवर गेल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर क्रिकेट स्पर्धा होणे 'मुश्किल': अख्तर

एएनआयने बीसीसीआय सूत्रांचा उल्लेख करत दिलेल्या वृत्तानुसार, सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसंदर्भातील निर्णय आणखी पुढे ढकलला आहे. यापूर्वी बीसीसीआय आणि आयपीएल आयोजकांनी २९ एप्रिलपासून होणारी स्पर्धा लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत म्हणजे १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाऊन आणखी १९ दिवस वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आयपीएल स्पर्धाही तुर्तास पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

'द वॉल' कोण? 'स्टेनगन'चा निशाणा चुकला!

देशातील सध्याची परिस्थिती पाहता आयपीएल स्पर्धा मे पर्यंत होणार नाही, हे मोदींच्या घोषणेनंतर जवळपास निश्चित झाले आहे. कोरोना विषाणूचा जगभरातील प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकावरही संकट घोंगावत आहे. आयपीएल स्पर्धेबाबत अद्याप कोणतीही ठाम भूमिका बीसीसीआयने घेतली नसली तरी परिस्थिती आणि वातावरण हे आयपीएलसाठी पोशख नाही. सध्याच्या घडीला आयपीएलचे कांऊटडाऊन हे लॉकडाऊनप्रमाणे वाढताना दिसत असून याबाबत बीसीसीआय  ठोस भूमिका कधी घेणार? हे येणारा काळाच ठरवेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after pm modi extended lockdown for 3rd of may bcci postponed the Indian Premier League IPL 2020 for the time being