पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CWG : भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाही स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे संकेत

ऑस्ट्रेलियाही भारताच्या बाजूने मैदानात उतरण्याचे संकेत

इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यासंदर्भातील भारताच्या भूमिकेनंतर ऑस्ट्रेलियाची पावलेही याच मार्गावर पडण्याचे संकेत मिळत आहेत. २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हा खेळ प्रकार वगळण्यात आल्यानंतर भारताने स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 

त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया देखील या स्पर्धेवर बहिष्कार टाकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शूटर्स यूनियन ऑस्ट्रेलियाकडून (यूएसयूए) राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. या संघटनेन ऑस्ट्रेलियातील बंदूक परवाना असलेल्या लोकांचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा दावा केला आहे. 

आम्ही सर्व राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी होऊ : साक्षी मलिक

ऑस्ट्रेलियाने  गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्ण पदकासह एकूण नऊ पदक मिळवली होती. भारतानंतर ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होते. एसयूएचे अध्यक्ष ग्राहम पार्क म्हणाले की, २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश करण्यासाठी इंग्लंडवर दबाव निर्माण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताला पाठिंबा द्यायला हवा. जर इंग्लंडने नेमबाजीचा समावेश केला नाही तर ऑस्ट्रेलियानेही स्पर्धेवर बहिष्कार टाकावा, असे ते म्हणाले.  

राष्ट्रकुल स्पर्धा : बहिष्काराचा निर्णय इतर खेळाडूंसाठी अन्यायकारक