पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मागील दहा वर्षांत सेहवागनंतर असा पराक्रम करणारा मंयक दुसरा सलामीवीर

मयंक अग्रवाल

India vs South Africa Mayank Agarwal: भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवालने पुण्याच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे आणि कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. मागील दशकभरात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सातत्यापूर्ण दोन सामन्यात शतक झळकवणारा मयंक अग्रवाल दुसरा सलामीवीर ठरला. यापूर्वी विरेंद्र सेहवागने असा पराक्रम केला होता. मयंक अग्रवालने १८३ चेंडूत शतक साजरे केले. विशाखापट्टणमच्या मैदानात त्याने द्विशतकी खेळी साकारली होती. 

INDvsSA ...म्हणून हनुमा विहारीला डावलून उमेश यादवला संधी

मयंक अग्रवाल १९५ चेंडूत १०८ धावा करुन माघारी फिरला. यात १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. कॅसिगो रबाडाने त्याच्या रुपात भारताला तिसरा धक्का दिला. मयंकचे हे सहाव्या सामन्यातील दुसरे शतक आहे. भारताविरुद्ध पुण्याच्या मैदानातून पदार्पण करणाऱ्या एनरिच नॉर्टजेचा एक चेंडू मयंकच्या हेल्मेटवर आदळल्याचे पाहायला मिळाले. हा चेंडू १४२ KM गतीने मयंकच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर संयमी खेळी करत अग्रवालने आपल्यातील क्षमता सिद्ध केली.

IND vs SA :... म्हणून या पिच क्यूरेटरची असेल खरी 'कसोटी'

उल्लेखनिय आहे की, २८ वर्षीय अग्रवालने ६ कसोटी सामन्यातील १० डावात ६०.५० च्या सरासरीने आतापर्यंत ६०५ धावा केल्या आहेत. यात दोन शतकांसह ३ अर्धशतकांचा  समावेश आहे. विशाखापट्टणमधील पहिले शतक द्विशतकात रुपांतरित करण्याचा पराक्रम मयंकने केला होता. या कसोटीतील पहिल्या डावातील २१५ ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after hitting bouncer mayank agarwal smash 2nd consecutive century against south africa in test cricket