पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SAvENG: मैदानातील आक्रमकपणा नडला! रबाडावर बंदीची कारवाई

रबाडाला सिलेब्रेशन महागत पडले

इंग्लंडचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील तिसरा सामना पोर्ट एलिझाबेथच्या मैदानात सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीच्या नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी रबाडावर कारवाई करण्यात आली आहे. 

INDvsAUS : दुसऱ्या सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर

पहिल्या दिवशीच्या खेळात रबाडाने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला तंबूत धाडले. रुटची विकेट मिळाल्यानंतर रबाडाने मैदानावर आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त केला होता. त्याच्या या कृत्याची सोशल मीडियावरही चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. त्याच्या या आक्रमकपणाची त्याला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आयसीसीने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली असून त्याला आता चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. 

INDvAUS: ऋषभ पंत ऐवजी 'या' विकेटकीपरची टीम इंडियात निवड

मैदानातील या कृत्यामुळे रबाडाच्या नावे एक डिमेरिट पाँइंट जमा झाला असून त्याला सामन्यातील मानधनापैकी १५ टक्के रक्कमही भरावी लागणार आहे. जो रूटने या सामन्यात ४६ चेडूंत २७ धावा केल्या होत्या. रबाडाने त्याला क्लीन बोल्ड केले होते.  या मालिकेतील पहिला सामना हा सेंच्युरियनच्या मैदानात खेळवण्यात आला होता. हा सामना जिंकत यजमान दक्षिण आफ्रिकेने मालिकात आघाडी घेतली होती. त्यानंतर केपटाउनच्या मैदानातील दुसरा कसोटी सामना जिंकत पाहुण्या इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली होती. चौथा आणि अखेरचा कसोटी सामना जोहन्सबर्गच्या मैदानात रंगणार असून या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला रबाडाशिवाय  मैदानात उतरावे लागणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:africa vs england Kagiso Rabada will miss the 4th Test after receiving one demerit point and a fine for his celebration after bowling Joe Root