पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बापरे! आंतरराष्ट्रीय T२० सामन्यात ६ धावांत अख्खा संघ ऑल आउट

प्रतिस्पर्धी संघानं पहिल्याच ओव्हर्समध्ये जिंकला सामना

क्रिकेटच्या मैदानात आपल्याला अशक्यप्राय विक्रम पाहायला मिळतात अगदी तसेच काहीवेळा आश्चर्यचकित करुन सोडणाऱ्या विक्रमाचीही नोंद होते. आफ्रिकेतील दोन महिला क्रिकेट संघात झालेल्या सामन्यात असाच काहीसा नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. हा अधिकृत टी २० सामना आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता प्राप्त असणारा सामना आहे. 

आफ्रिकेमधील माली आणि रवांडा या देशांतील महिला टी २० संघात झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात रवांडाने मालीच्या संघाला ९ षकटात अवघ्या ६ धावांवर गारद केले. विशेष म्हणजे यातील ५ धावा या अवांतर स्वरुपात मिळाल्या आहेत. मालीकडून सलामीवीर मरियम समाकेनेला हिला फक्त खाते उघडण्यात यश आले. तिने केवळ एक धाव काढली. बाकी सर्व महिला खातेही न उघडता तंबूत परतल्या.  ६ धावांचे आव्हान रवांडा महिला संघाने एकही गडी न गमावता ४ चेंडूत पार केले. 

ICC WC 2019 : बीसीसीआयचा रिव्ह्यू फेल! धवन 'आउट' पंत 

आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला आणि पुरुष या दोन्हींच्या टी २० सामन्यात सर्वात कमी धावांवर बाद होण्याच्या नकोशा विक्रमाची नोंद माली महिला संघाच्या नावे झाली आहे. यापूर्वी टी २० क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावावंर सर्वबाद होण्याचा विक्रम चीनच्या महिला संघाच्या नावे होता. २०१९ मध्ये युएईने चीन महिलांना १४ धावांत गुंडाळले होते.  

धोनीच्या निवृत्तीवर मॅग्राची 'मन की बात'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Africa countries Mali Women record lowest ever total in T20I cricket history all out on 6 runs against rawanda womens team