पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विंडीजने २ दिवस २ तासांत ९ गडी राखून नोंदवला 'वजनदार' विजय

रहकीम कॉर्नवाल

Afghanistan vs West Indies: वेस्टइंडीजने अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात विंडीजने अफगाणिस्तानला पराभूत केले आहे. २ दिवस आणि २ तासांत ९ गडी राखून विंडीजने सामना खिशात घातला. रहकीम कॉर्नवाल याने या सामन्यात १० विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले. विडींजकडून शामराह ब्रूक्सने १११ धावांची खेळी केली. 

बुमराहची गोंलदाजी शैली फलंदाजासह त्याच्यासाठीही धोक्याची : कपिल देव

अफगाणिस्तानने पहल्या डावात १८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीजने पहिल्या डावात २७७ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानचा दुसरा डाव १२० धावांत आटोपला. विंडीजने ३१ धावांचे आव्हान ९ गडी राखून पार केलं. अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर अफगाणिस्तान आण विंडीज यांच्यात हा सामना खेळवण्यात आला.

INDvsWI T20 : सलामीचा सामना मुंबईऐवजी हैदराबादमध्ये, पण...

भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेवपूर्वी विंडीजसाठी हा विजय आत्मविश्वास दुणावणारा ठरेल. अफगाणिस्तानचा पहिला डाव १४० किलो वजन असलेल्या फिरकीपटूसमोर हतबल ठरला. कॉर्नवालने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात ३ बळी टिपत विंडीजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याचे आतापर्यंतचे ही सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. ६ डिसेंबरपासून विंडीजचा संघ भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारतापूर्वीच्या मालिकेपूर्वी विंडीज संघाने अफगाणिस्तान विरुद्ध मालिका खेळली. बीसीसीआयच्या अफगाणिस्तानचे घरचे मैदान म्हणून भारतामध्येच