पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐतिहासिक विजयानंतर अफगानच्या बच्चे कंपनीचा VIDEO व्हायरल

अफगाणिस्तानमध्ये बच्चे कंपनीने असा केला जल्लोष

अफगाणिस्तानने दमदार कामगिरी करुन दाखवत बांगलादेशला घरच्या मैदानात पराभूत केले. आंतरराष्ट्रीय कसोटीची मान्यता मिळाल्यानंतर अफगानने खेळलेल्या तीन कसोटी सामन्यापैकी त्यांचा हा दुसरा विजय आहे. त्यामुळेच अफगाण क्रिकेट संघाच्या या अभिमानस्पद कामगिरीने अफगाणिस्तानच्या नागरिकांत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.  

एका बाजूला अफगाणिस्तानचे खेळाडू चितगावच्या मैदानात आनंदोत्सव साजरा करत होते. तर दुसऱ्या बाजूला अफगाणीस्तानची बच्चे कंपनी टेलिव्हिजनसोर नृत्य करत संघाच्या विजयाचे सेलिब्रेशन केले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी शफीक स्टानिकझाई यांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात अफगाणिस्तान बच्चे कंपनी आपल्या संघाचा विजयाचे जल्लोषात स्वागत करताना दिसत आहे.  

'शेर-ए-बांग्ला ढेर' अफगाणचा कसोटीत 'शानदार' विजय

बांगलादेशमधील चितगावच्या मैदानात रंगलेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने दिमखादर विजय नोंदवला होता. या सामन्यात त्यांनी बांगलादेशला २२४ धावांनी नमवले होते. ५ नोव्हेंबरपासून अफगाणिस्तान विंडीजविरुद्द तीन टी-२०, तीन एकदिवसीय सामन्यासह १ कसोटी सामना खेळणार आहे.