पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता मुख्य प्रशिक्षक निवडीवेळी विराटची मनमानी चालणार नाही

विराट कोहली आणि रवी शास्त्री

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने जाहीरात प्रसिद्ध केली आहे. सध्या संघाच्या प्रशिक्षक पदावर असलेल्या रवी शास्त्रींना देखील नव्याने निवड प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. बीसीसीआय त्यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवणार की अन्य नावाचा विचार करणार? याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. 

टीम इंडियासाठी BCCI ला हवा असा कोच!

मात्र, यावेळी भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीच्या निर्णयात कर्णधार विराट कोहलीला कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही, असे एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीने प्रशिक्षण निवडीसंदर्भात हस्तक्षेप केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने रवी शास्त्रींना पाठिंबा दिल्याची चर्चा देखील चांगलीच रंगली होती.  

INDvsWI: ३ ऑगस्टपासून भारताचा विंडीज दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

कोहलीचे नेतृत्व आणि शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली. पण सेमीफायनलमधील न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे शास्त्रींच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संघाच्या प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेत विराट कोहली हस्तक्षेप करु शकणार नाही, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. प्रशिक्षक निवडण्याचा निर्णय हा भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव घेणार आहेत. कपिल देव हे सपोर्ट स्टाफ नियुक्त करणाऱ्या तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत. कपिल देव यांचा निर्णय विराटलाच नव्हे तर संपूर्ण टीमला मान्य करावाच लागेल. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: according to reports virat kohli will have absolutely no say in new india head coach selection