पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रकुल स्पर्धा : बहिष्काराचा निर्णय इतर खेळाडूंसाठी अन्यायकारक : अभिनव बिंद्रा

अभिनव बिंद्रा

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नेमबाज अभिनव बिंद्राने राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकणे अयोग्य आहे, असे मत व्यक्त केले. २०२२ मध्ये बर्मिंगहॅमध्ये रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली भारताकडून सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बिंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.

स्पर्धेवर बहिष्कार टाकणे हा योग्य पर्याय नाही. भारतीय ऑलिम्पिक संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी प्रकार समावेश करण्यासंदर्भात प्रयत्न करावे, असा सल्लाही बिंद्राने दिला आहे. बिंद्राने ट्विटमध्ये लिहलंय की, 'बहिष्कार टाकून प्रभाव पडत नाही. या निर्णयाची शिक्षा इतर खेळांडूना भोगावी लागेल. भारतीय ऑलिम्पिक संघाने नेमबाजीचा कोर सूचीमध्ये सामील करण्याबाबत राष्ट्रकुल महासंघ समितीकडून पाठिंबा मिळवणे हा उत्तम पर्याय ठरेल. त्यामुळे भविष्यात असा प्रकार घडणार नाही.

भारताकडून राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली

जूनमध्ये  राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी प्रकार वगळण्याचा निर्णय घेतला होता. १९७० नंतर पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी खेळ प्रकार वगळण्यात आला आहे.