पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एबी वर्ल्ड कपमध्ये खेळायला तयार होता, पण...

एबी डिव्हिलियर्स  (Getty Images)

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. संघ बिकट परिस्थितीत असताना दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांना आता एबीची आठवण सतावत आहे. एबी डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर आता तो विश्वचषकात खेळण्यास इच्छुक होता, अशी माहिती समोर येत आहे. एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डासमोर विश्वचषकात खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण निवड समितीतील सदस्यांनी त्याचा प्रस्ताव फेटाळून लावला.

जर धोनी असेल तर मी पुढचा वर्ल्ड कप खेळेन : एबी

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा १५ सदस्यीय संघ निवडण्याच्या एक दिवसापूर्वी डिव्हिलियर्सने बोर्डाकडे प्रस्ताव दिला होता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी निवडसमितीच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा केली. पण अवघ्या चोवीस तासांत त्याला संघात घेण्याचा विचार निवड समितीला पटला नाही.  

२०१८ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर विश्वचषकाच्या संघात निवडीच्या प्रक्रियेमध्ये तो सहभागी नव्हता. याशिवाय तो देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यातही सक्रीय नसल्यामुळे त्याची निवड करण्याऐवजी निवड समितीने पाकिस्ताविरुद्ध पदार्पणात तीन अर्धशतके लगावणाऱ्या  रॅसी वॅन डेर डूसन याला संधी दिली होती.  

ICC WC 2019, #INDvSA : रोहितनं चोकर्संना रडवलं, आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:AB de Villiers wanted to come out of retirement for World Cup offer rejected by South Africa management