पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी

एबी डिव्हिलियर्स  (Getty Images)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने एबी डिव्हिलियर्ससमोर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. खुद्द एबीने एका कार्यक्रमात यासंदर्भातील माहिती सांगितली आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबीने मे २०१८ मध्ये अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासून एबी डिव्हिलियर्स राष्ट्रीय संघात पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगत आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती.  

वॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा

३६ वर्षीय डिव्हिलियर्सने  स्पोर्ट्स शो 'क्रिकेट कनेक्टेड' मध्ये यासंदर्भात भाष्य केले. तो म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची इच्छा आहे. आफ्रिका बोर्डाने मला संघाचे नेतृत्व करण्याबाबतचा प्रस्ताव देखील दिला होता. राष्ट्रीय संघात परतण्यासाठी माझी कामगिरी पूर्वीसारखी असावी असे मला वाटते. अकरामध्ये स्थान मिळवण्याचा हक्कदार आहे असे वाटेल  तेव्हा संघात परतेन, असेही त्याने बोलून दाखवले.   

ECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी

डिव्हिलियर्सने दक्षिण अफ्रिकेकडून ११४ कसोटी, २२८ एकदिवसीय सामने आणि ७८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असून चांगल्या कामगिरीसह संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. यावेळी डिव्हिलियर्सने संघात जागा मिळवण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वासही व्यक्त केलाय. यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी डिव्हिलियर्सला आपल्यातील चमक दाखवून द्यावे लागेल, असे म्हटले होते.