भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा यांनी दशकातील बेस्ट टी-२० संघ निवडला आहे. आपल्या संघात त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला स्थान दिल्यामुळे काही भारतीय चाहत्यांनी त्यांना संतप्त सूरात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर संताप व्यक्त करणाऱ्या आणि टोमणे मारणाऱ्या चाहत्यांना आकाश चोप्रा यांनी उत्तर दिले आहे.
IndvsSL: नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात पाऊस ठरला सामनावीर!
आकाश चोप्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून विराट कोहली टी-२० मध्ये दशकातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचा उल्लेख केलाय. गोलंदाजीमध्ये त्यांनी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाला तर अष्टपैलू खेळाडूमध्ये त्यांनी आफ्रिदीला स्थान दिले आहे. यष्टिरक्षक म्हणून त्यांनी जोस बटलरला पसंती दिली आहे. आफ्रिदीचा यात समावेश असल्यामुळे भारतीय चाहत्यांनी आकाश चोप्रा यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तुम्ही आफ्रिदीला स्थान का दिले. तुम्हाला पाकिस्तानी चाहत्यांच्या मनात घर करायचंय का? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावर आकाश चोप्रांनी स्टेट ड्राइव्ह मारावा तसे सरळ आणि थेट उत्तर दिले आहे.
Video : असं कवा कुणी 'बोल्ड' होतं का राव!
संतप्त प्रश्न उपस्थित करणाऱ्या चाहत्यांना उत्तर देताना आकाश चोप्रा यांनी लिहलंय की. २०१० मध्ये तुम्ही टी-२० आंतरराष्ट्रीय रेकॉर्डवर नजर टाकलेली नाही. अगोदर रेकॉर्ड पाहा. त्यानंतर बोला. आफ्रिदीने ९९ टी-२० सामन्यात १७.९२ च्या सरासरीनं आणि १५० च्या स्ट्राइक रेटने १ हजार ४१६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये २४.४४ ची सरासरी आणि ६.६३ इकोनॉमी रेटने ९८ बळी टिपले आहेत. २००९ मध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकला त्याममध्ये आफ्रिदीची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली होती. अंति सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यातही आले होते.
#AakashVani Awards for the best in T20i in 2010s (decade)
— Aakash Chopra (@cricketaakash) January 1, 2020
Batsman— Kohli
Bowler— Malinga
All-Rounder—Afridi
Wicketkeeper—Buttler
What’s yours? ☺️