पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

4th T20I : पाकला नमवत द. आफ्रिकेच्या महिलांनी रचला नवा इतिहास

दक्षिण आफ्रिकेची फलंदाज एल ली

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी-२० च्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिलांनी पाकिस्तानी महिलांना ४ विकेट्स आणि ५ चेंडू राखून पराभूत केले. या सामन्यात प्रथम फंलदाजी करणाऱ्या पाकिस्तानने नादिया दार हिच्या ३७ चेंडूतील ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेच्या महिलांसमोर १७३ धावांचे लक्ष्य ठवले होते. प्रत्युत्तरा दाखल दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान ५ चेंडू राखून पार केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी आंतरराष्ट्री टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. 

ICC World Cup: विराट ब्रिगेड लंडनमध्ये दाखल, असा आहे वार्मअप प्लॅन
 

या सामन्यात अनेक विक्रमांची नोद झाली आहे. पाकिस्तानच्या नादिया दारने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावत क्रिकेटच्या ऑल फॉर्मेटमध्ये जलद अर्धशतक करणारी दुसरी फलंदाज ठरली. बेनोनीच्या मैदानात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकात ५ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. एल ली ६० (३१) आणि टी ब्रिट्स १८ (२२) यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. लीने आक्रमक फलंदाजी करत २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 

भारतीय क्रिकेट संघातही PUBG प्रेमी मंडळ
 

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या मध्यफळीतील क्लेर्क (२२),  कर्णधार लुइस (१७), ट्रायन (२१),  एम ड्यु प्रिझ (७) धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात जाफ्राने १० चेंडूत १४ आणि एस इस्माइलने ६ चेंडूत १० धावांची नाबाद खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.