पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३६ वर्षांपूर्वी याच दिवशी पाकला नमवत टीम इंडियाने पहिल्यांदा उंचावला होता आशिया चषक

सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली पाकला पराभूत करत भारताने पहिल्यांदा आशिया चषक स्पर्धा जिंकली होती.

१३ एप्रिल १९८४ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय दिवस आहे. याच दिवशी भारतीय संघाने तत्कालीन अष्टपैलू आणि संघाचा हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या कपिल देव यांच्या अनुपस्थितीत पाकला पराभूत करत आशिया चषक उंचावण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरले होते. 

माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू म्हणाला, IPL मध्ये या फलंदाजांनी दमवलं

पाक विरुद्धच्या सामन्या यष्टिरक्षक सुरिंदर खन्ना यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या कपिल देव यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागले होते. कपिल देव भारतीय संघासोबत होते. पण घोट्याच्या दुखापतीमुळे ते मैदानात उतरु शकले नव्हते. आशिया चषकातील अंतिम सामन्यात पाकल नमवत भारतीय संघाने पहिल्यांदा आशिया चषक उंचावला होता.  या मालिकेतील पहिल्या सामन्यात  मदनलाल, चेतन शर्मा आणि मनोज प्रभाकर यांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ अवघ्या ९६  धावांत आटोपला. त्यानंतर सुरिंदर खन्ना नाबाद  ५१ आणि गुलाम परकार यांनी केलेल्या ३२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने सलामीच्या सामन्यात दहा गडी राखून दमदार विजय नोंदवला होता. .  

माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू म्हणाला, IPL मध्ये या फलंदाजांनी दमवलं

शारजहाच्या मैदानात रंगलेल्या आशिया चषकातील भारत-पाक यांच्यातील अंतिम सामन्यात सुरिंदर खन्ना यांच्या ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या  भारताने निर्धारित ४६ षटकात ४ बाद १८८ धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४० षटकात १३४ धावांतच आटोपला होता.आशिया चषकात आतापर्यंत भारताचा दबदबा राहिला आहे.  भारतीय संघाने विक्रमी सातवेळी ही स्पर्धा जिंकली आहे. २०१६  मध्ये आशिया चषक स्पर्धा ही टी-२० प्रकारात खेळवण्यात आली होती. यंदा या स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानला मिळाले होते. सप्टेंबरमध्ये होणारी स्पर्धा कोणत्या ठिकाणी खेळवावी ही चर्चा सुरु असताना कोरोना विषाणूमुळे स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.