पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्ल्ड कप : धोनी-युवी शिवाय या त्रिकुटाचे योगदानही अविस्मरणीयच!

धोनी आणि गंभीर

आजच्या दिवसाला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खास महत्त्व आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २ एप्रिल रोजी क्रिकेटच्या देवाचे स्वप्न साकार करत २८ वर्षांनी विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखीलल भारतीय संघाने १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर २००३ मध्ये सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली मात्र रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन शिलेदारांनी भारतीय संघाला पराभूत केले होते.

कोविड-१९ : गौतम गंभीर यांचे दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीला

 २००७ च्या विश्वचषकात द्रविडच्या नेतृत्वाखालील भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अखेर  २०११  मध्ये सघाने एकीचे बळ दाखवून दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला. घरच्या मैदानावर झालल्या विश्वचषक स्पर्धेत संघातील सर्वच खेळाडूंनी त्या त्या वेळी योगदान दिले. षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्बत करणारा महेंद्रसिंह धोनी सामनावीर ठरला तर युवीने स्पर्धेत लक्षवेधी खेळी करत मालिकावीरचा मान मिळवला. भारताच्या ऐतिहासिक विजयात गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि मुनाफ पटेल या त्रिकुाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.  

गौतम गंभीर 
वानखेडेच्या मैदानात श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात धडाकेबाज सेहवाग खातेही उघडू शकला नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर माफक धावा करुन तंबूत परताल. दोन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यावर भारतीय संघ अडचणीत आला होता. मात्र गौतम गंभीरने खंबीर खेळीचा नजराणा दाखवून देत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शतकाला हुलकावणी मिळाली असली तरी त्याची ही खेळी अविस्मरणीय अशीच आहे.  

रोहित-बुमराह जोडीबद्द्लची ही गोष्ट तुम्हाला माहितीये?

विरेंद्र सेहवागची स्फोटक फंलदाजी
 २०११ च्या विश्वचषकात सेहवाग-सचिन जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी चोख पार पाडली. सेहवागने स्पर्धेत १२२.५८ च्या स्ट्राइक रेटने  ३८०  धावा कुटल्या. बांगलादेशविरुद्ध त्याने १७५ धावांची खेळी केली. त्याच्या स्फोटक खेळीमुळे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचे खांदे पडल्याचे पाहायला मिळाले. त्याची स्फोटक खेळी भारतासाठी जमेची बाजू ठरली.  

मुनाफ पटेल
धोनीने स्पर्धत मध्यमगती गोलंदाज मुनाफ पटेल याच्यावर अधिक विश्वास दाखवला. झहीर खानला त्याने उत्तम साथ दिली. मुनाफ पटेलने ८ सामन्यात११बळी घेत तत्कालीन कर्णधार धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. स्पर्धेत त्याने ५.३६ इकॉनॉमीने गोलंदाजी केली यात बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने ४ ८ धावा खर्च करत ४  बळी टिपले.