पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर या खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळू शकेल तगडी रक्कम

आयपीएलच्या लिलावात यांच्यावर लागू शकेल चांगली बोली

आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी १९ डिसेंबरला कोलकातामध्ये होणाऱ्या लिलावात देश-परदेशातील खेळाडून सहभागी होणार आहेत. आयपीएलमध्ये काही खेळाडूंना आश्चर्यकारकरित्या मोठी रक्कम मिळाल्याचे आपण यापूर्वीच्या हंगामात पाहिले आहे. आयपीएलच्या १२ व्या हंगामात वरुण चक्रवर्तीसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने तब्बल ८ कोटी ४० लाख रुपये मोजले होते. यापूर्वीच्या हंगामात म्हणजे २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटला ८ कोटी ४० लाख रुपयांत खरेदी केले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये काही खेळाडूंवर अशीच आश्चर्यकारकरित्या बोली लागू शकते. नजर टाकूयात अशाच तीन खेळाडूंवर ज्यांना मोठी रक्कम मोजण्यास फ्रेचायजीस सहज तयार होतील.  
बँडन किंग
बँडन किंग

विंडीजचा डावखुरा सलामीवीर ब्रँडन किंग याच्यावर यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली बोली लागल्याचे पाहायला मिळू शकते. कॅरेबियन प्रीमियर लीग २०१९ मध्ये त्याने कमालीची कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. गयाना अमेझन वॉरियर्सकडून खेळताना बँडन किंगने १२ सामन्यात ५५.११ सरासरी आणि १४८.९४ च्या स्ट्राइक रेटने ४९६ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने १ शतकासह ३ अर्धशतकेही झळकावली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक ३२ षटकार लगावण्याचा विक्रमही बँडन किंगच्या नावे आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये त्याला कोणता संघ आपल्या ताफ्यात घेण्यास पसंती देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

कैस अहमद कैस अहमद

अफगाणिस्तानच्या कैस अहमदची टी-२० तील कामगिरी ही लक्षवेधी अशीच आहे. त्याने ३५ टी-२० सामन्यात १८.६३ च्या सरासरीने ४४ बळी मिळवले आहेत.  अबूधाबी टी-10 लीगमधील ७ सामन्यात त्याने ९ बळी मिळवले होता. १९ वर्षीय लेग स्पिनरला लिलावात चांगली रक्कम मिळू शकते.  
अर्जुन तेंडुलकर
अर्जुन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील यंदाच्या आयपीएलमधील लक्षवेधी खेळाडू ठरु शकतो. अष्टपैलू कामगिरीने त्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. मुंबई २० लीगमध्ये त्याने चांगली कामगिरी करुन दाखवली होती. अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. जर तो या लिलावात सहभागी झाला तर त्याला अष्टपैलूच्या रुपात एक चांगली रक्कम मिळू शकते.