पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'याच अ‍ॅटिट्यूडचे पैसे..' सेहवागच्या चहलला हटके शुभेच्छा!

युजवेंद्र चहल

टीम इंडियाचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकजण त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. संघ सहकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून चहलला शुभेच्छा देत असताना माजी क्रिकेटर आणि विनोदी स्वभावाच्या वीरेंद्र सेहवागने नेहमीप्रमाणे हटके अंदाजात चहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.     

विश्वचषक स्पर्धेदरम्यान चहलचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसताना सीमारेषेवर पाण्यांच्या बाटल्या समोर ठेवलेल्या फोटोत चहल ऐटीत बसल्याचे पाहायला मिळाले होते. हा फोटो एका खास कॅप्शनसह शेअर करत सेहवागने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवागने या फोटो शेअर करताना लिहिलंय की,  'हॅप्पी बर्थडे युजवेंद्र चहल! इसी एटिट्यूड के पैसे हैं, बाकी सब एक जैसे हैं!' 

गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल-कुलदीप यादव या फिरकीपटूंनी एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात चहलने चांगली कामगिरी करुन दाखवत आपला क्षमता सिद्ध केली आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत ४९ वनडे आमि ३१ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. वनडेत चहलच्या नावे ८४ तर टी-२० सामन्यात ४६ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: 29th birthday of yuzvendra chahal here is how virender sehwag wished him a very happy birthday