आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यातील दिर्घ चर्चेअंती यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
२४ जूलैपासून जपानच्या टोकियो शहरात या स्पर्धेला सुरुवात होणार होती. पण कोरोनाच्या दहशतीनंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. २०२१ च्या उन्हाळ्यात ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले.
अधिक जगण्यासाठी थोडी शैली बदलू : उद्धव ठाकरे
कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनी स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि न्यूजीलंड या राष्ट्रांनी देखील ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्यावर भर दिला होता. सध्याच्या परिस्थितीत स्पर्धेसाठी कोणतीही तडजोड करु नये, अशी भूमिका या राष्ट्रांनी घेतली होती. कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
जगभरातून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जवळपास ६८ टक्के खेळाडूंनी स्पर्धा पुढे ढकलायला हवी, अशी भावना व्यक्त केली होती. जपान मागील सात वर्षात स्पर्धेच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. इस्तांबूल आणि माद्रिदला मागे टाकत जपानने मानाच्या स्पर्धेचे यजमानपद मिळवले होते.