पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

2019 च्या अखेरच्या टी-20 सामन्यात राशिदची धुलाई

राशीद खान

बिग बॅश लीग (बीबीएल) च्या हंगामात राशिद खानने कमालीची कामगिरी केली. पण वर्षातील अखेरच्या दिवशी त्याची चांगलीच धुलाई झाल्याचे पाहायला मिळाले. अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्सकडून प्रतिनिधीत्व करणाऱ्या राशिदने सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात त्याची गोलंदाजी चांगलीच महागात पडली. आपल्या ४ षटकांच्या कोट्यात त्याने ४४ धावा दिल्या.  

अनुष्काच्या या कलेचं विराटकडून कौतुक

अफगाणिस्तानचा राशिद टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. सिडनी थंडर विरुद्धच्या सामन्यात बीबीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील राशिदची ही सर्वात खराब कामगिरी आहे. सिडनी थंडरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार कॅलम फर्गसनने ४६ चेंडूत ७३ धावा केल्या. राशिदनेच त्याला तंबूत धाडले. मात्र यापूर्वी कॅलम फर्गसनने आपले काम केले होते. कर्णधाराच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर सिडनी थंडरने निर्धारित २० षटकात ५ बाद १६८ धावा केल्या होत्या. 

जलदगती गोलंदाजाचा पराक्रम! सचिन-द्रविड या दिग्गजांच्या पक्तींत स्थान

राशिदने गोलंदाजीतील उणीवर फलंदाजीदरम्यान भरुन काढली. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर त्याने १८ चेंडूत ४० धावा करत सामन्याला कलाटणी देणारी खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी तो तंबूत परतल्यानंतर अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्सला ३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्सला अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. क्रिस मॉरिसने वेस अगरला तंबूत धाडत सिडनी थंडरच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:2019 20 Rashid Khan goes for his most expensive figures in BBL sydney thunder vs adelaide strikers match ads vs syt