२००० मध्ये सामना निश्चितीमुळे (मॅच फिक्सिंग) जंन्टलमनच्या खेळाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले होते. याप्रकरणातील आरोप असलेल्या संजीव चावला याला गुरुवारी इंग्लंडहून प्रत्यार्पणाच्या आधारे नवी दिल्लीत आणण्यात आले. त्याची आता चौकशी करण्यात येणार असून सामना निश्चितीसंदर्भात अनेक रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाचे इंग्लंडहून भारतात
# १९९६ मध्ये चावला पहिल्यांदा व्यापारी व्हिसावर इंग्लंडमध्ये गेला होता. इंग्लंडच्या न्यायालयातील दस्ताएवजानुसार ५० वर्षीय संजीव चावला हा एक व्यावसायिक आहे. त्यानंतर भारतामध्ये त्याचे येणे जाणे असायचे.
#२००० मध्ये मॅच फिक्सिंगच्या प्रकरणातील दिवंगत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हन्सी क्रोनिएसह अनेक माजी भारतीय खेळाडूंची नावे समोर आली होती. हन्सी क्रोनिएचे विमान दुर्घटनेत निधन झाले होते.
# २००० मध्ये जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान चावलाची तत्कालीन दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्रोनिएसोबत भेट घडवून आणण्यात आली होती. चावलासह आणखी एकाने क्रोनिएसमोर सामना हरल्यास मोठी रक्कम मिळवू शकतोस असा प्रस्ताव ठेवला.
#२००० मधील फेब्रुवारी-मार्च दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आल्यानंतर क्रोनिएला पैसे देण्यात आले. या पैशाच्या मोबदल्यात चावलाने सामना निश्चीतीचा गेम खेळला.
#२००५ मध्ये चावलाला इंग्लंडचा पासपोर्ट मिळाला. तेव्हापासून तो इंग्लंडचा नागरिकत्वावर त्याच ठिकाणी वास्तव्यास होता.
एप्रिल २००० मध्ये हे प्रकरण उघडकीस आले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १६ फेब्रुवारी ते मार्च २००० दरम्यान झालेल्या सामन्यातील काही सामन्यात पराभूत होण्यासाठी क्रोनिएने पैसे घेतले होते. चावला आणि क्रोनिए यांच्यातील फोन संभाषण दिल्ली पोलिसांनी टेप केले होते. यापूर्वी १९९९ मध्ये इंग्लंडच्या दोन खेळाडूंशी संपर्क करुन त्यांच्यासमोर मॅच फिक्सिंगचा प्रस्ताव ठेवल्याचा आरोपही चावलावर आहे.