पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ

लॉकडाउनच्या काळात इटलीत टेरिसवर टेनिस खेळणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातल आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांवर लॉकडाउनची नामुष्की ओढावली आहे. इटलीमध्ये सर्वाधिक बिकट परिस्थिती दिसून आली होती. परिणामी जगभरातील इतर देशांच्या तुलनेत इटलीमध्ये कठोरपणे लॉकडाउनचे पालन करण्यात येत आहे. लॉकडाउनच्या कालावधीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत याठिकाणी युवा खेळाडूंनी अनोख्या पद्धतीने टेनिस खेळत संकटातून सावरत असल्याचा संकेत दिला.

कोविड -१९: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा स्थगित

कोरोनाच्या संकटामुळे टेनिसमधील लाकप्रिय विम्बल्डन स्पर्धा रद्द झाली. याशिवाय अमेरिकन ओपनवरही संकट घोंगावताना दिसते आहे. दरम्यान इटलीतील दोन युवा तरुणींनी दोन वेगवेगळ्या टेरिसला कोर्टच रुप देऊन अफलातून टेनिसच्या खेळाचं दर्शन घडवल्याचे पाहायला मिळाले. या तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अवघ्या 22 सेकंदाच्या हा व्हिडिओ एटीपीने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन देखील शेअर केला आहे. याशिवाय महिला टेनिस स्टार स्टेफानोस सितसिपास आणि एबीए स्टार रॅक्स चॅपमॅन या दिग्गज खेळाडूनही तरुणींच्या खेळाच्या हटके अंदाजाचे कौतुक केले आहे. 

जगभरात आतापर्यंत २३ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून १ लाख ६२ हजार लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगभरातील १९३ देशांना प्रभावित केले आहे. इटलीमध्ये कोरोनाने मृत्यू तांडव माजवले. इटलीत सध्या लॉकडाउनची परिस्थिती असून नागरिक कोरोनाचा सामना जिंकण्याठी प्रामाणिकपणे नियमाचे पालन करत आहेत. दरम्यानच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच पालन करत लॉकडाउनमध्ये दोन तरुणींनी अनोख्या पद्धतीने खेळाचं स्पिरीट दाखवून दिले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:2 young girls playing tennis from their apartment rooftops during Italy street coronavirus lockdown watch Incredible video