पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020 Auctions : टॉप बकेटमध्ये दोन भारतीयांसह चार परदेशी खेळाडू

युसूफ पठाण

आगामी आयपीएलच्या हंगामासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. कोणत्या खेळाडूवर अधिक बोली लागणार आणि कोणत्या खेळाडू अनसोल्ड राहणार? अशा अनेक गोष्टी १९ तारखेला समोर येणार आहेत. लिलावाला अवघे तीन दिवस उरले असताना इंडियन प्रिमियर लीगच्या अधिकृत ट्विटरवरुन आघाडीच्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सचिनचा जबरा फॅन अन् सल्लागाराचा शोध संपला

या ट्विटनुसार, सहा खेळाडूंच्या यादीत दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या लिलावात आठ संघ आपला ताफा मजबूत करण्यासाठी बोली लावतील. ख्रिस लीन, डेल स्टेन, सॅम कुरन, केसरिक विल्यम्स यांच्यासह युसूफ पठाण आणि पियुष चावला यांचा टॉप बकेटमध्ये समावेश आहे. 

Video : हेटमायरचा सुपरहिट सिक्स, विराटही झाला अवाक्

या सहा खेळाडूंना आपापल्या फ्रँचायझींनी रिलिज केले आहे. ऑस्ट्रेलियन ख्रिस लीन यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. त्याची मुळ किंमत दोन कोटी एवढी आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेनही २ कोटी, इंग्लंडचा सॅम कुरन, युसूफ पठाण आणि पियुष चावला हे प्रत्येकी १ कोटी तर विंडीजच्या केसरिक विल्यम्सची मुळ किंमत ५० लाख इतकी आहे. या खेळाडूंना लिलावात काय भाव मिळणार ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.