पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs BAN: दिल्लीत भारत जिंकला असता बांगलादेशने 'दंगल' केली असती

बांगलादेशने टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

India vs Bangladesh, Delhi T20I: तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत दिल्लीच्या मैदानात झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने विजयी सलामी दिली. हवेच्या प्रदूषणाची पातळी धोकादायक असताना अरुण जेटली मैदानावर हा सामना खेळवण्यात आला. सामन्यापूर्वी बांगलादेशी खेळाडूंनी मास्क बांधून सराव केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सामन्यादरम्यान सर्व काही सामान्य असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र आता या सामन्यातील काही गोष्टी समोर येत आहेत. सामन्यादरम्यान दोन बांगलादेशी खेळाडूंना त्रास झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बांगलादेशने हा सामना जिंकल्यामुळे कदाचित याचा फारसा गवगवा झाला नाही. जर भारताने बाजी मारली असती तर आरोपप्रत्यारोपाची   दंगल उसळली असती.    

स्मिथच्या खेळीनं कांगारुंचा पाकविरुद्धच्या हारारकीचा खेळ खल्लास!

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या सौम्य सरकार आणि एका अन्य खेळाडूला हवा प्रदूषणाचा चांगलाच त्रास जाणवला. त्यांनी उलटी देखील केली. दिवाळीनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली होती. सामना झाल्यानंतर खेळाडूंना त्रासाचा सामना करावा लागल्याचे वृत्त समोर आले आहे. सलामीच्या सामन्यात मुशफिकर रहिम यांने सिंहाचा वाटा उचलला होता. नाबाद ६० धावा करत त्याने संघाला मालिकेत आघाडी मिळवून दिली. त्याला सौम्य सरकारनेही उत्तम साथ दिल्याचे पाहायला मिळाले होते.

टी-१० लीग : अभिनेत्री सनी लिओनी या संघाची ब्रँड अँबेसिडर

सामन्यापूर्वी महमदुल्लाने म्हटले होते की, 'संघाने तीन दिवस दिल्लीच्या वातावरणात सराव केला आहे. खेळाडूंनी परिस्थितीनुसार वातावरणाशी जुळवून घेतले आहे. सुरुवातीला आम्हाला त्रास झाला पण आम्ही परिस्थितीवर मात करुन सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. बांगलादेशच्या संघाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत सामन्यात आघाडी घेतली आहे.