US Open 2019: तब्बल २३ वेळा ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या सेरेना विलियम्सला कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कूने पराभवाची धूळ चारली. जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेली बियांका अवघ्या १९ वर्षांची आहे. तिने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत सेरेनाचा सरळ सेटमध्ये ६-३, ७-५ असा पराभव करत किताब आपल्या नावावर केला. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती कॅनडाची पहिली महिला खेळाडू ठरली. खेळाच्या सुरुवातीपासूनच तिने सामन्यावर वर्चस्व राखले होते. या पराभवामुळे सेरेनाची ऑस्ट्रेलियाच्या मार्गरेट कोर्टचा २४ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी हुकली.
श्रीलंका संघातील सिनिअर्सचा पाकिस्तानला जाण्यास नकार
माझी स्वप्नं पूर्ण करणारं हे वर्ष ठरलं असल्याची प्रतिक्रिया बियांकाने सामना जिंकल्यानंतर दिली. यूएस ओपन जिंकणारी बियांका ही दुसरी 'टीनएजर' खेळाडू ठरली आहे. याआधी मारिया शारापोव्हाने २००६ मध्ये हा किताब पटकावला होता.
'थ्रीडी गॉगल'च्या ट्विटचा पश्चाताप नाही : रायडू
तत्पूर्वी, सेरेनाने उपांत्यफेरीत युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाला ६-३, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. सेरेना दहाव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. तर बियांकाने उपांत्य सामन्यात १२ व्या स्थानावर असलेल्या बेलिंडा बेनकिक ला ७-६, (७-३), ७-५ असे पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती.