पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रमी खेळीनंतर शेफाली म्हणाली, मुलांसोबत खेळल्याचा फायदा झाला

शेफाली वर्मा

भारतीय महिला क्रिकेट संघातील १६ वर्षीय शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार पटकवला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिने ४६ धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यापूर्वी बांगलेदेश विरुद्धच्या सामन्यातही तिला 'प्लेअर ऑफ मॅच' या पुरस्कारने गौरविण्यात आले होते. 

T-20 WC: हॅटट्रिकसह भारतीय महिलांनी दिमाखात गाठली सेमीफायनल!

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर शेफाली म्हणाली की, पॉवर प्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात करुन देण्याच्या इराद्यानेच आम्ही मैदानात उतरलो. मैदानात उतरल्यानंतर खराब चेंडूची वाट पाहिली अन् मिळालेल्या संधीचा फायदा घेत फटकेबाजी करण्यावर भर दिला. माझ्या शैलीतच खेळण्यावर लक्षकेंद्रीत केले आणि मला यश मिळाले. ती पुढे म्हणाली मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मुलांसोबत प्रक्टिस केली आहे. मी माझ्या वडिलांसह मला प्रक्टिससाठी मदत करणाऱ्या मुलांची अभारी आहे, असेही ती यावेळी म्हणाली. मुलांसोबत केलेल्या प्रॅक्टिसमुळे मी आज एक चांगली फंलदाज म्हणून तुम्हाला दिसत आहे, असा उल्लेखही तिने यावेळी केला. 

रशियन सुंदरीचा टेनिसला अलविदा!

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला विश्वचषकातील आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात शेफालीने लक्षवेधी खेळी केली आहे. सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने २९ धावांची छोटीखीनी पण महत्त्वपूर्ण खेळी केली होती .बांग्लादेश विरुद्ध ३९ धावा करणाऱ्या शेफालीने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ४६ धावा केल्या. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील 'प्लेयर ऑफ द मॅच'मध्ये तिने अनोखा विक्रम आपल्या नावे केला होता. शेफाली वर्मा सर्वात कमी वयात 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवणारी खेळाडू ठरली होती. तिने १६ वर्ष आणि २७ दिवस एवढ्या वयात हा पराक्रम करुन दाखवला.

टी-२० विश्वचषकात शतकासह या महिला खेळाडूनं रचला अनोखा विक्रम

यापूर्वी तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ३० वर्षांपासून आबाधित असलेला विक्रम मागे टाकला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारी ती भारतीय फलंदाज आहे. शेफालीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात १५ वर्ष आणि २८५ दिवसांत अर्धशतक झळकावले.सचिन तेंडुलकरने  १६ वर्ष आणि २१४ दिवस वयात पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते. 

महिली टी-२० मध्ये स्ट्राइक रेटमध्ये अव्वलस्थानी

न्यूझीलंड विरुद्धच्या  दमदार खेळीच्या जोरावर शेफालीने आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावे केलाय. महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करण्याचा पराक्रमही तिने आपल्या नावे केलाय. शेफालीने १४७.९७ च्या स्ट्राइक रेटने टी-२० मध्ये ४३८ धावा केल्या आहेत.  तिने १३८.३१ च्या स्ट्राइक रेटने ७२२ धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या क्लो ट्रायऑन हिच्यासह १२९.६६ च्या स्ट्राइक रेटने १ हजार ८३५ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन एलिसा हिली यांना मागे टाकले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: 16 year old shafali verma now has highest strike rate in womens t20 also 2nd time player of the match in icc womens t20 world cup record