पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: सचिनच्या शतकांच्या शतकाचा अन् गिब्जच्या आतषबाजीचा दिवस

हर्षल गिब्ज आणि सचिन तेंडुलकर

क्रिकेटच्या मैदानात काही अशा विक्रमाची नोंद आहे की जे दिर्घकाळ अबाधित राहतात. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने आजच्याच तारखेला पण वेगवेगळ्या वर्षात दोन अनोखे विक्रम आपल्या नावे केले होते. तर दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार फलंदाज हर्षल गिब्जने अविश्वसनीय विक्रम आपल्या नावे नोंदवला होता. दोन्ही दिग्गजांचे हे विक्रम अद्यापही अबाधित आहेत. जाणून घेऊयात १६ मार्च रोजी क्रिकेटच्या इतिहासात नोंदवलेल्या अविश्वसनीय आणि अविस्मरणीय विक्रमाबद्दल...   

शोएब अख्तर म्हणतो, भारतीयांना पाकिस्तानशी युद्ध नकोय...

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी शेर-ए- बांगलादेशच्या मैदानावर ११४ धावांची खेळी करत शंभरावे शतक साजरे केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९९ शतकानंतर तब्बल एका वर्षाच्या अंतराने तेंडुलकरने शंभरी साजरी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. तसेच शंभर शतके नोंदवणारा सचिन हा पहिला खेळाडू आहे.  १६ मार्च २००५ मध्ये सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. १९५ डावात त्याने हा टप्पा पार केला होता.  कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातील सचिनची ही कामगिरीही क्रिकेटच्या मैदानातील एक अभूतपूर्व विक्रमच आहे. या विक्रमी कामगिरीनंतर २०१२ मध्ये याच दिवशी सचिनने बांगलादेशविरुद्ध  एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ वे शतक साजरे करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंतकांचे शतक साजरे केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सचिनच्या नावे ५१ शतकांची नोंद आहे.   

कोरोनामुळे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद अडकले जर्मनीत

क्रिकेटच्या मैदानात याच दिवशी आणखी एक विक्रम नोंदवला गेला. १३ वर्षांपूर्वी २००७ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्जने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रम नोंदवण्याचा पराक्रम केला होता. गिब्जने नँदरलंड विरुद्धच्या सामन्यात डान वॅन बुंगच्या एका षटकात सहा षटकार खेचले होते. ग्रॅहम स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाने या सामन्यात ४० षटकात ३ बाद ३५३ धावा केल्या होत्या. या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाला ९ बाद १३२ पर्यंत मजल मारता आली होती.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:16 march historical day for world cricket sachin tendulkar smash 100th century herschelle gibbs 6 sixes in one over