पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीलंकेच्या १० खेळाडूंनी दिला पाकला दणका! दौऱ्यातून घेतली माघार

श्रीलंकेतील प्रमुख खेळाडूंची पाक दौऱ्यातून माघार

श्रीलंकन संघातील १० खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्याला जाण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूंनी घेतलेली ही भूमिका पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे पुन्हा उघडण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का देणारी अशीच आहे. 

२७ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा नियोजित आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघादरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र १० प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यासाठी संघात सहभागी होण्यास नकार कळवला आहे.  

'शेर-ए-बांग्ला ढेर' अफगाणचा कसोटीत 'शानदार' विजय

पाकिस्तान दौऱ्यातून आपले नाव माघारी घेणाऱ्या खेळाडूंमध्ये श्रीलंकन टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि अ‍ॅजेलो मॅथ्यूज  यांच्याशिवाय,निरोशा डिक्वेला, कुशल परेरा, धनंजय डी सिल्वा, तिसारा परेरा, अकीला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल आणि दिमुथ करुणारत्न या खेळाडूंचा समावेश आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:10 ri Lanka cricket players have pulled out from the teams tour to Pakistan over security situation