पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पृथ्वीचा डबल धमाका, प्रथम श्रेणीतील पहिले द्विशतक

पृथ्वी शॉ

मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने बुधवारी प्रथम श्रेणीतील आपले पहिले वहिले द्विशतक झळकावले. रणजी चषकातील बडोदा विरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने हा पराक्रम केला. मुंबईकर पृथ्वी शॉने पहिल्या सामन्यात १७९ चेंडूत २०२ धावांची खेळी केली. यात त्याने १९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या डावातील ५६ व्या षटकात पृथ्वी बाद झाला. त्याला भार्गव भट्टने तंबूचा रस्ता दाखवला.  

ज्वाला गुट्टाचा प्रशिक्षक गोपीचंद यांच्यावर गंभीर आरोप

पहिल्या डावात पृथ्वी शॉने ६६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने द्विशतकी खेळी करुन आपल्यातील क्षमता दाखवून दिली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात मुंबईने ४ बाद ४०९ धावा केल्या. पहिल्या डावात मुंबईने ४३१ धावा केल्या होत्या. तर बडोदाच्या संघाला ३०७ धावांपर्यंत मजल मारता आली होती. दुसऱ्या डावात बडोदाने ७४ धावांत ३ गडी गमावले असून बडोदाला सामना जिंकण्यासाठी ४६० धावांची गरज आहे. 

गब्बर वनडे मालिकेलाही मुकणार, मयांकला मिळणार संधी

डोपिंगमुळे निलंबित झालेल्या पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली चषकातून दिमाखात पदार्पण केले होते. या सर्व प्रकारानंतर भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी त्याची ही खेळी महत्त्वपूर्ण ठरेल. त्याच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून त्याच्या खेळीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title::ranji trohhy 2019 Prithvi Shaw scores maiden first class double century twitter reaction