पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटन पंतप्रधानांना मोदींकडून समजली अ‍ॅशेसची विशेष न्यूज

इंग्लंडच्या विजयाचे वृत्त मोदींनी पहिल्यांदा बोरिस यांना दिले

 हेडिंग्लेच्या मैदानात अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने रोमहर्षक विजय मिळवला. बेन स्टोक्सच्या कमालीच्या कामगिरीनंतर मिळालेल्या विजयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असताना ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉन्सन मात्र इंग्लंडच्या विजयाच्या वृत्तापासून अनभिज्ञच होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडने रोमहर्षक विजय मिळाल्याची सर्वात पहिल्यांदा माहिती दिली. 

VIDEO : मोदी-ट्रम्प यांच्या भेटीतील 'दे टाळी' क्षण

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या जी ७ परिषदेमध्ये सहभागी झालेल्या मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यापूर्वी रविवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली. या भेटीवेळी मोदींनी त्यांना इंग्लंडने हेडिंग्लेच्या मैदान मारल्याची 'ब्रेकिंग न्यूज' दिली. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी आयपॅड मागवत अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यांची हायलाइटस् पाहण्यास पसंती दाखवली. 

Ashes 2019 : स्टोक्सची अविश्वसनीय खेळी, इंग्लंडने मैदान मारलं

दरम्यान यावेळी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान सॉट मॉरिसन यांनी इंग्लंड संघाने सामना जिंकल्याबद्दल बोरिस यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मालिकेतील दोन कसोटी सामने शिल्लक असल्याची देखील आठवण करुन दिली. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यातील दुसरा सामना अनिर्णत राहिला होता. तर पहिला सामना जिंकून आघाडी मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पराभव स्वीकारावा लागला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title::Indian PM Narendra Modi broke news of England historic win in Headingely test to Brithish PM Boris Johnson at G7 Summit